Three militants killed in encounters in Jammu and Kashmirs Shopian Bandipora 
Three militants killed in encounters in Jammu and Kashmirs Shopian Bandipora  
देश

श्रीनगर : जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, 24 तासांत 5 ठार

सकाळवृत्तसेवा

श्रीनगर : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या चोवीस तासापासून शोपियन जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. 

जम्मू-काश्मीरमधील शोपियन व बंदीपोरा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले. गेल्या 24 तासांत पाच दहशतावाद्यांचा खात्मा केला असल्याची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. शोपियन भागात अद्यापही दोन ते तीन दहशतवादी लपले असल्याने येथे चकमक सुरुच आहे. बंदीपोरा जिल्ह्यातील चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'चे दोन दहशतवादी मारले गेले आहे. तोयबाचा टॉप कमांडर अली भाई याचा खात्मा करण्यातही भारतीय जवानांना यश आले आहे. 

दहशतवाद्यांविरूद्ध हे ऑपरेशन गुरुवारी (ता. 21) सुरू करण्यात आले होते. परंतु सुरक्षा दलाला सावधगिरी बाळगणे आवश्यक होते, कारण दोन नागरिकांना अतिरेक्यांनी बंदीस्त केले होते, असे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एका नागरीकाला गुरुवारी वाचविण्यात यश आले पण दुसऱ्याला चकमकीत जीव गमवावा लागला असल्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT